Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता बैठक; निरीक्षक आदीक यांचे मार्गदर्शन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संवाद आढावा बैठक पार पडली.

यावेळी पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी पक्ष संघटनेच्या विविध आघाड्या, अभियान यांचा पक्ष पदाधिकारी यांचेकडून आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, माजी आमदार अरुण पाटील, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जिल्हा प्रवक्ता योगेश देसले, महिला आघाडी मंगलाताई पाटील, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, ईश्वर रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, विलास धायडे, सोशियल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, दिलीप माहेश्वरी, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, युवक आघाडी तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी शहराध्यक्ष निता ताई पाटील, युवती आघाडी तालुका अध्यक्ष आम्रपाली पाटील, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, लिलाधार पाटील, शहर अध्यक्ष अशोक नाईक, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सोपान दुट्टे, कल्याण पाटील, डॉ बि सी महाजन, चंद्रकांत बढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी प्रास्तविक करताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या आठ महिन्यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून आमच्या सोबत प्रवेश करणारे कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते सर्व एकदिलाने पक्षाचे कार्य करत आहोत. त्याचाच भाग म्हणून पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. आमची बुथ रचना ‘वन बुथ टेन युथ’ रचना सुरू असुन लवकरच पूर्ण करून येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीत त्याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने काम करून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या मुळे नाथाभाऊ यांच्या मागे ईडी लागली परंतु नाथाभाऊ या सर्व बाबींना पुरून उरतील तुमचे सर्वांची साथ, आशिर्वाद त्यांच्या सोबत आहेत.

 

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, मुक्ताईनगर मतदारसंघ हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून गेल्या 30 वर्षापासून नाथाभाऊ यांच्या समवेत संघर्ष करत आलेलो आहे. परंतु सर्व मतभेद विसरून नाथाभाऊ यांचे सर्व प्रथम मी पक्षात स्वागत केले. त्याप्रमाणे आपणही बसर्व एकमेकांमध्ये काही मतभेद असतील तर ते विसरून एकदिलाने पक्षाचे कार्य करा, आता नाथाभाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे पक्षात नवचैतन्य संचारले आहे.  मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सहकारातील सर्व निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्विवाद यश मिळेल

जो पक्ष विरोधी कार्य करेल त्याची पक्षात गय केली जाणार नाही त्याच्या वर कार्यवाही करण्यात येईल.

 

 

सरकारच्या माध्यमातून आपण अपुर्ण राहिलेले विकास कामे पूर्ण करू. त्यासाठी नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मी, रोहिणीताई नेहमीसाठी प्रयत्नशील आहोत. आमचा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना पक्ष निरीक्षक अविनाश आदिक म्हणाले, एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने पक्षाला उत्तर महाराष्ट्रामध्ये बळ मिळाले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळेल व जळगाव जिल्हा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनेल यात कोणतीही शंका नाही.

 

यावेळी डॉ बि सी महाजन, सुधाकर जावळे, अतुल युवराज पाटील, चंद्रकांत बढे प्रवीण पाटील, हरिशचंद्र ससाणे, एजाज खान अहमद खान, अनिल दत्तात्रय पाटील, सुनिल काटे, प्रेमचंद बढे, विजय भंगाळे, वासुदेव बढे, विकास पाटील, विनोद महाजन अतुल पाटील, संदिप जावळे, रवी सुरवाडे, रघुनाथ सापधरे, बाबुराव दिनकर पाटील, श्रीराम मोतीराम चौधरी, ब्रिजलाल रामदास पाटील, प्रवीण दामोदरे, राजेश ढोले पाटील, मुन्ना बोडे, बाळासाहेब सोनवणे, जितेंद्र तायडे, निलेश खोसे, गोपाळराव पाटील, मोहन चौधरी, रवींद्र मुरलीधर पाटील, डॉ.राजेश पाटील, मधुकर पुरी गोसावी, अजमल चव्हाण, धनराज पाटील, संजय भोलाणकर, योगेश पाटील, ललीत पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, उद्धव महाजन, भागवत वाघ, ज्ञानेश्वर कुटे, नितेश राठोड, हरलाल राठोड, छगन राठोड, रविंद्र धाडे, हनीफ खान, सोपान धाडे, सुभाष खाटीक, प्रभाकर सोनवणे, सुरेश तायडे, कैलास झालटे, गोविंदा साहेबराव पाटील, संदीप ज्ञानेश्वर सांबारे, योगेश रामदास पाटील, रामराव पाटील, प्रमोद भालेराव, रोशन पाटील, प्रफुल्ल पाटील, सुधाकर उखावले, वैभव गोपाळ धायडे, विलास शंकर पुरकर, राजू पिळदकर, विकास पुरकर, किरण पाटील, योगीता वामनाचर्य, माधुरी पाटील, भाविनी वामनाचार्य, रुचिता उज्जैनकर, अजय आढायके, पवन चौधरी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version