Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे मराठा आरक्षण रद्द केल्याचा निषेधार्थ निवेदन

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी  । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाची अनेक वर्षापासून मागणी होती. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले, बेचाळीस मराठा बांधवांनी आत्मबलिदान दिले. मराठा समाजाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज होती मात्र असे असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा तरुण देशोधडीला लागून त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर सकल मराठा समाज बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन  देण्यात आले.  निवेदन देतेवेळी समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव  यू. डी. पाटील ,कोषाध्यक्ष वसंत पाटील, सहसचिव संदीप बागुल, संचालक ईश्वर रहाणे ,दिनेश कदम, दिलीप पाटील (सर), संतोष मराठे, नवनीत पाटील, अॅड. पवन राजे पाटील व इतर समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version