Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध

मुक्ताईनगर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गरिबांच्या हजारो मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थपक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

 

भारतीय जनता पक्षाचे नेत्यांमध्ये सध्या समाजात आदर्श असणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधाने करून समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि समाजात दुफळी माजविण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. यातून समाजात प्रचंड रोष असून तो उफाळून येऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचू शकतो.  आपल्या राज्यात सर्व समाज गुण्या गोविंदाने राहत असुन सर्व देशाला मार्गदर्शक असे महापुरुष या राज्यात होऊन गेले आहेत ज्यांच्या विचारांनी हजारो वर्षे या समाजाला दिशा मिळत आहे आणि मिळत राहील.  परंतु, भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळविर नेते यांना हे सहन होत नाही. त्यामुळे हे या महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधाने करून समाजात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी अशा वाचाळविर नेत्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी शासनाला विनंती करत आहोत.  जेणेकरून भविष्यात कोणी असे विधाने करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही.  बाबत तहसीलदार व  पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.  निवेदन देताना शहराध्यक्ष राजू माळी, युवक शहराध्यक्ष बबलु सापधरे, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नंदकिशोर हिरोळे, माजी सरपंच प्रवीण पाटील,अजीज खान, पंकज महाजन,अजय अडके, अॅड. राहुल पाटील, भैयाभाऊ पाटील, सुनील काटे, संजय कोळी, सुमित तळेले, निलेश भालेराव, जीवन रमेश गणेश, विवेक पंडित बोदळे,आकाश ससाने, फिरोज रशीद, चेतन राजपूत, पंकज रोटे, विशाल रोटे कुऱ्हा,वसंतराव पाटील, जुबेर भाई अली, मुस्ताक  मनियार, निलेश खोले,चंद्रकांत पाटील, अनिस पटेल, इरफान खान शब्बीर खान, समीर शेख नाझीर शेख,वहाफ खान, रवी सुरवाडे, राजेश वानखेडे, योगेश पाटील,अमोल बोदळे,सुनील जाधव, नईम खान बागवान, नितीन  कांडेलकर अविनाश राणे, जितेंद्र जुमळे,संध्या हिरोळे, साखराबाई मोरे, शैलेश वानखेडे, राऊफ खान,दीपक साळुंखे,आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version