Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे आमदार पडळकरांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याविषयी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या जाहिर निषेध व्यक्त करत प्रवर्तक चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आ.पडळकर यांनी जाहीर माफी मागवी अन्यथा चोप देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस युवकतर्फे देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोटे आरोप करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांच्या मनात संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष ॲड. पवनराजे पाटील यांनी याप्रकाराबाबत आ.पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या काळात प्रशासनाने घरी थांबून सुरक्षित राहण्याचे आवाहन केलेले असताना, असे वादग्रस्त व्यक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. याला कारणीभूत गोपीचंद पडळकरवर गुन्हे दाखल करून त्याची आमदारकी रद्द करावी अन्यथा आंदोलन तिव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादि युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. पवनराजे पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, ऋषिकेश पाटील, रोहित सोनावणे, अविनाश जैन, लखन पाटील, नरेंद्र पाटील, सोनू पाटील, श्रीकांत पाटील, प्रमोद सॊन्दले, विकी ठाकरे, उमेश भोलाणे, प्रशांत पाटील, सागर भोई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version