Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना २५ टक्के सूट मिळवून दिल्याने महाराष्ट्र स्टुडन्ट युनियनच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

शासकीय अभियांत्रिकी कॉलेज चा विद्यार्थ्यांना 25 टक्के सूट मिळाली, या करिता महाराष्ट्र स्टुडेंट युनियनने मागणी केली विविध बैठका घेतल्या, भीक मागो उपक्रम राज्य भरात राबविण्यात आला आणि जळगाव ला ही मासु चे जिल्हा सचिव यांचा नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला होता, जळगाव ला उदय सामंत आले तेव्हा त्यांना जळगाव टीम ने भेट दिली. विभाग प्रमुख अभिजित रंधे व जिल्हाध्यक्ष अँड. रोहन महाजन, जिल्हा सचिव रोहित काळे आदी उपस्थित होते.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयने जी प्रवेश शुल्क जाहीर केल होते .ती शुल्क विद्यार्थ्यांना अमान्य आहे.विद्यार्थ्याचे अशी तक्रार आमच्या मासुच्या प्रतिनिधीकडे राज्य कार्यकारणी सदस्य आणि जिल्हा सचिव रोहित काळे यांच्या कळे करण्यात आली होती. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या संस्थापक अध्यक्ष अँड. सिद्धार्थ इंगळे यांच्याकडे केली असता, त्यांनी तात्काळ निवेदन देण्यास सांगितले आणि जळगाव मासू टीमने प्राचार्य, जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.

उदय सामंत यांनी 6 वेळेस बैठका झाल्यात पण निर्णय होत नसल्याने मासू ने भीक मागो उपक्रम राबविण्याचे ठरवले आणि संस्थापक अध्यक्ष अँड सिद्धार्थ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात आला आणि जळगाव जिल्ह्यात जिल्हा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आणि 9 महिने इतका कालावधी वाट बघून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 25 % शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची वार्षिक फी माफी करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन स्वागत करते पण विद्यार्थ्यांची मागणी 25% फी माफीची नाही होती, पण इतर सर्व शुल्क जे विद्यार्थी ज्याचा वापर करत नाही. तो शुल्क का भरावा जसे की डेव्हलपमेंट, जिमखाना आणि इतर शुल्क पूर्ण माफ करणार यावा आणि फक्त शिकवणी शुल्क आकारण्यात यावा, ह्या मागणीवर आता पण महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ठाम आहे आणि या पुढे आम्ही प्रयत्न शिल असू से मासू च्या पदाधिकारी यांनी सांगितले. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वार्षिक फी माफी संदर्भात मागणीला यश आणि थोडा का होईना, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version