Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर पोलिसांच्या ताफ्यात नवीन चारचाकी वाहन दाखल

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी  । येथील पोलीस स्टेशनला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक नवीन चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज या वाहनाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला होता यात १४  चारचाकी वाहनांचा समावेश होता तर उर्वरित १५  वाहने व ७०  दुचाकी  दोन-तीन महिन्यात पोलीस दलात दाखल  होतील, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एक नवीन चारचाकी वाहन आज दि. ६ एप्रिल रोजी  उपलब्ध झाले. सदरील नवीन वाहनाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक  सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळुंके, शिवसेना तालुका प्रमुख  छोटू  भोई, शेमळदे माजी सरपंच दिलीप पाटील सर, नगरसेवक तथा गटनेते राजु हिवराळे, माजी उपतालुका प्रमुख प्रशांत भालशंकर, शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळेआदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चार चाकी  वाहनांची संख्याही खूप कमी असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रचंड दमछाक होत असल्याची , त्यातच सध्याची वाहने जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी, इंजिन दुरुस्ती डोकेदुखी ठरत होती. या समस्यांचे गाऱ्हाणे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडले त्यानुसार याची घेऊन  जळगांव जिल्हा पोलिस दलासाठी भरीव निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमार्फत  केल्याने  २९  पैकी १४ नवीन वाहनांचा ताफा शुक्रवारी दाखल झाला. व जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन ला  वितरीत करण्यात आला. यातीलच एक नवीन चारचाकी  वाहन मुक्ताईनगर पोलिस स्टेशन ला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार  प्राप्त झाले या वाहनाचे पूजन व लोकार्पण आमदार चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील पोलिसांना बळ देण्यासाठी DPDC तून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिला भरीव निधी:-

जिल्हा नियोजन समितीने २९  चारचाकी वाहने व  ७०  दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी दोन कोटी ३०  लाख ९६  हजार ४७८  रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातील एक कोटीची वाहने खरेदी करण्यात आले आहेत.अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

Exit mobile version