मुक्ताईनगर नगरपंचायत व नगरसेवक झोपेत : रस्त्यांची दुरवस्था 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरामधील सर्व प्रभागांमध्ये समस्यांचे सगळे प्रश्न सुटले असताना प्रभाग क्रमांक 13 वर अन्याय का?

असा प्रश्न आता प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना पडलेला आहे. एन पावसाळ्यामध्ये चॅनलला व पेपरला बातम्या छापून सुद्धा येथील नगरसेवक व नगरपंचायत गाढ झोपेतच आहेत. एन पावसाळ्यात रस्त्यांवरती मुरूम पण टाकल्या गेलेल्या नाही.

आणि आता तर बस स्टॅन्ड ते रेणुका माता मंदिर रोडला कामाची मंजुरी मिळालेली आहे असे सांगून किती तरी दिवस उलटले रस्ता खोदून ठेवलेला आहे व मोठमोठे दगड रस्त्यांमधून बाहेर काढून ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणाहून जाताना येण्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे तरी नगरसेवक व नगरपंचायत सपशेल लक्ष द्यायला तयार नाही. कितीतरी रहिवाशी क्लासेस शाळा ह्या प्रभागांमध्ये आहे. लहान लहान मुलांसाठी हा रस्ता खूप फायदेशीर ठरलेला आहे. त्यांच्यातरी जीवाचा विचार करा असे नागरिकांकडून बोलण्यात येत आहे .हा रस्ता बनणार तरी कधी असा प्रश्न नागरिक आता विचारू लागलेले आहेत.

Protected Content