Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा (व्हिडिओ)

मुक्ताईनगर पंकज कपले । आदिवासी बांधवांचा भूमी मुक्ती मोर्चा प्रणित बहुजन मुक्ती मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

 

प्रवर्तन चौकात थोर महापुरुष बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले यांच्या प्रतिमांना हार घालून तिथून  तहसील पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले.  इतर पारंपारिक जनजाती भटके आणि विमुक्त समाज आज मुख्य धारेपासून वंचित आहे. आदिवासी समाजाचे जीवनमान आणि आर्थिक सुधारणा व्हावी तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 आणि 2008 व सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी व्हावी. आदिवासी गावात जनजागृती करून प्रकरणे प्राप्त करून घेण्यासाठी सर्व समावेशक आराखडा अंमलबजावणी करणे कामी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज विहित मुदतीत पूर्ण करणार असे भुसावळ उपविभागीय समितीकडे जिल्हाधिकारी यांनी भूषण कोळी पूर्णकालीन यांची नियुक्ती केलेली आहे.  पण यांच्याकडे अतिरिक्त भार असल्या कारणाने त्यांना पूर्णवेळ कामकाज द्यावे अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली.  आदिवासी बांधवांच्या ठळक मागण्या राशन कार्ड आहे, पण धान्य मिळत नाही. मतदान कार्ड आहे पण मतदार यादीत नाव नाही.  आदिवासी विभाग यांची योजना आहे पण सर्व्हे  पूर्ण न करता बँक खाते पैसे देत नाही. आदिवासी कायदा अंतर्गत गुण व पूजन वरील हक्क आहे पण वन विभाग अधिकारी आणि कर्मचारी वनात प्रवेश करू देत नाही.  सामूहिक भूधारणा पद्धती पूर्ण समूहासाठी वस्तीस्थान आणि वस्ती सामूहिक दावा अंतर्गत देणे, जैविक विविधता बौद्धिक संपत्ती व पारंपारिक ज्ञान भटके आदिवासी यांचे करिता पारंपारिक संसाधन जोपासणार अन्य पारंपारिक हक्क चराई क्षेत्र, जलसंपत्ती नदी क्षेत्र, झरे, नाले, तलाव, वाळू गाळाची माती यासारखे आणि निस्तार सारखी हक्क प्रलंबित दाव्यांचा निपटारा व पट्टे वाटप प्रलंबित महसूल दाव्याचे विहित नमुन्यात सर्कल मार्फत नजराणा रक्कम काढून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवणे अशा संघटनेमार्फत मागण्या करण्यात आल्या.

मोर्चा  उत्तर महाराष्ट्र प्रमुख  भाई प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भाई प्रमोद पोहेकर , प्रा,सचिन झनके, भाई अशोक इंगळे , बहुजन मुक्ती पार्टीचे भाई प्रमोद सौंदडे, भाई शंकर जगन्नाथ गायकवाड, भाई विलास हिरोनी, भाई प्रदीप वानखेडे, परशुराम गुलाब,  अग्रेसिव महिला जय अंबाबाई भोसले, जानकाबाई पवार, जुळमाबई कावजी  पवार आदी सहभागी झाले होते.

 

 

 

Exit mobile version