Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर-जामनेर बसमधुन तीन महिलांच्या सोन्याची मंगलपोत लंपास

chori

जामनेर प्रतिनिधी । मुक्ताईनगर ते जामनेर बसमध्ये चढतांना तीन महिलांच्या मंगळ पोत अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर येथुन जामनेरकरीता काही महिला प्रवासी बस क्र (एमएच २० डी ८८५७) मध्ये बसल्या. बस जामनेरमध्ये दाखल होताच सोन्याच्या पोती चोरली गेली असे महिलांच्या लक्षात आल्यानंतर बस थेट जामनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. बसमधील प्रवाश्यांपैकी धनराज रामकृष्ण माळी रा. कुऱ्हाड ता.पाचोरा व्यवसाय शेती यांनी अज्ञात विरुदध फिर्याद दाखल केली. यात शोभाबाई माळी प्रमिला माळी दोन्ही रा. कुऱ्हाड ता.पाचोरा आणि रेखाबाई माळी रा.पाळधी ता. जामनेर यांच्या सुदधा मणी व मंगळसुत्र अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे. यात जवळपास ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय सुदंरडे करीत आहे.

Exit mobile version