Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात ५१ गुढी उभारल्याने गुढीपाडवा व मराठी नववर्षाला घडले “संस्कृती आणि परंपरेचे दर्शन”

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुढी पाडवा व मराठी नवं वर्ष म्हणजे गुढी पाडवा…सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..अशा सोनेरी दिवसाच्या औचीत्याने मुक्ताईनगरात एकुण ५१ गुढी उभाररून गुढीपाडवा व मराठी नववर्षाला संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडल्याचे दिसून आले.

 

मुक्ताईनगरात आ.चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यानिमीताई चंद्रकांत पाटील व कु. संजनाताई चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवर्तन चौक ते बोदवड रोड बस स्टँड, भुसावळ रोड व बुऱ्हाणपूर रोड वरील दुभाजकामध्ये  दिंडोरी प्रणित, श्री.स्वामी समर्थ सेवा मार्गातील परंपरेची संस्कृतीची आणण्यात आलेली सुमारे  51 गुढी  उभारून शहरात चैतन्य दायी वातावरण तयार करण्यात आलेले होते. व  सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या नागरिकांना देण्यात आल्या होत्या.  सकाळी 10 वाजता प्रवर्तन चौकात  सौ.यानिमीताई चंद्रकांत पाटील व कु. संजनाताई चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते भव्य स्वरूपात उभारण्यात आलेल्या सर्वात उंच गुढीचे पूजन करून जनतेच्या सुख समृद्धी साठी ईश्वरा कडे प्रार्थना करण्यात आली.

 

यावेळी छोटू भोई, प्रफुल्ल पाटील, गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, युनूस खान, सलीम खान, शकुर जमदार, मुशिर मणियार, हर्षराज पाटील , प्रकाश गोसावी, स्वप्नील श्रीखंडे, गौरव दुट्टे, किरण कोळी, सुभाष बनिये,दिलीप पाटील , शिवराज पाटील, संचालाल वाघ, उमेश पाटील, रामभाऊ कुंभार , प्रभाकर पाटील, राजू कापसे , रवी चव्हाण, प्रवीण चौधरी, अर्जुन भोई, सोपान मराठे, हरी माळी, केलास डहाके,मुकेश माळी यांच्यासह सरिताताई कोळी , भावनाताई गायकवाड, उषाताई पाटील आदींची उपस्थिती होती.

 

“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, संस्कृतीची गुढी, परंपरेची गुढी येथे उभारल्याने मुक्ताईनगर येथे प्रथमच चैतन्यदायी वातावरण निर्माण झालेले दिसून येत होते.”

Exit mobile version