Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात माय-लेकास पोलिसांची अमानुष मारहाण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे संचारबंदीच्या काळात दिव्यांग वडिलांची औषधी आणण्याासाठी बाहेर पडलेल्या मुलासह त्याच्या आईला पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून रस्त्यांवर फिरणार्‍या लोकांना पोलीस प्रशासन फटके देताना दिसत आहेत. यात काही ठिकाणी कारण नसतांना मारहाण होत असल्याचा आरोप होत आहेत. भुसावळ येथील एका शिक्षकाला अमानुष मारहाण केल्यामुळे नागरिक संतप्त झाले असतांना मुक्ताईनगरच्या एका मुलाला आणि त्याच्या आईला पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर येथे सूरज गोसावी हा तरूण आपल्या अपंग वडिलांची औषधी घेण्यासाठी गेला असता त्याला पोलिसांनी मारहाण केली. ही माहिती मिळताच त्याची आई वाचवण्यासाठी मध्ये आली असता तिलादेखील मारहाण करण्यात आली. पोलिसांनी महिलेला मारहाण करत पोलिसांनी पोलीस स्थानकात नेऊन तिथे प्रथम महिला पोलीस आणि त्यांनतर ४ ते ५ पोलिसांनी दांड्याने गंभीर स्वरूपाची मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अशी माहिती भावना गोसावी यांनी दिली. या प्रकाराने खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

Exit mobile version