Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात पुन्हा १८ लाखांचा गुटखा जप्त

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणार्‍या वाहनातून तब्बल १८ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई आज करण्यात आली आहे.

 

मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असल्यामुळे मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी होत असते. अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला असता, बर्‍याचदा या प्रकारे गुटख्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना जप्त करण्यात आले आहे. आज सकाळी अशाच प्रकारची कारवाई मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टजवळ करण्यात आली आहे.

 

मध्यप्रदेशातून एमएच १९ बीएम २३८४ या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पीकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची तक्रार नाशिक येथील गुप्तचर खात्याकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने चेक पोस्टवर सापळा रचून सदर वाहन थांबविण्यात आले. यात तपासणी केली असता १८ लाख रूपयांचा विमल या ब्रँडचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुटखा आणि वाहन मिळून एकूण २२ लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version