Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण

 मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील प्रभाग क्रमांक १४ येथील काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील प्रभाग क्रमांक १४ येथे गायत्री  किराणा ते लक्ष्मण भोईयांच्या घरापर्यंत रस्त्याचे नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरण झालेले आहे.  या रस्त्याचे आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करून तो नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात आला.  याप्रसंगी प्रभाग १४ च्या नगरसेविका सविता सुभाष भलभले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई ,शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी,  प्रशांत पाटील तसेच प्रभागातील मिराबाई पाटील ,लताबाई ठाकरे ,शालिनी गलवाडे , उज्वला पाटील, अलकाबाई मराठे, कस्तुराबाई पाटील, पिंपरीकर गुरुजी,  संदीप चौधरी, पंडित टेलर ,संभाजी मराठे, रमन वायरमन, गणपत बोराखडे, शशिकांत गलवाडे, लक्ष्मण नरेंद्र सापधरे (सर), पुरुषोत्तम पोलाखरे, चेतन पाटील, शरद गोसावी, ललित काठोके व प्रभागातील  इतर नागरिक उपस्थित होते.

 

Exit mobile version