मुक्ताईनगरात आगामी संणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील  पोलीस पाटलांची महत्त्वपूर्ण बैठकीचे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.  

 

आज दि. ५ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी  बैठकीत  पोलीस पाटील यांना पोळा व गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा  करण्याबाबत आवाहन केले. तसेच पोळा तसेच  गणेश उत्सव आगमन व विसर्जन वेळी मिरवणुक काढु नये याबाबत मार्गदर्शन केले.  यावेळी  कोरोना अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडील प्राप्त सूचना समजून सांगण्यात आल्यात.  यात  सार्वजनिक  गणेश मुर्ती ४ फुट व घरगुती गणेश मुर्ती २  फुट  पेक्षा मोठी नसावी तसेच ऑनलाईन परवानगी फार्म भरू सोबत हमीपत्र जोडणे याबाबत मार्गदर्शन केले.  या  बैठकीस ५७ पोलीस पाटलांनी हजेरी लावली होती. 

 

Protected Content