Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरातील ताडी विक्रीवर नियंत्रण कुणाचे ? नागरिकांना पडला प्रश्‍न !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कथित सरकार मान्यता असणार्‍या ताडी विक्री केंद्रांवर नेमके कुणाचे नियंत्रण आहे ? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.

 

मुक्ताईनगर शहरामध्ये ताडी पिणार्‍यांची संख्या वाढली आहे. तालुक्यात एकही ताडीचे वृक्ष नसताना नेमकी ताडी येथे कुठून व येत जरी असली तर ते बनवल्या जाते कुठे व कशा रसायनमार्फत बनवली जाते याकडे अन्न औषध विभाग व पुरवठा विभाग या संदर्भात लक्ष देत नसून हजारो लिटर ताडी मुक्ताईनगर शहरामध्ये सर्रासपणे अवैधरित्या विकली जात आहे

 

मुक्ताईनगर शहरांमध्ये तालुक्यामध्ये अथवा जवळपास असलेल्या राज्यांमध्ये ताडीचे एकही झाड उपलब्ध नसताना मुक्ताईनगर शहरांमध्ये ताडी हा मद्य नशेचा प्रकार कुठून येत आहे याकडे पोलीस प्रशासन या विभागाचे लक्ष नाही का ? शासनाने ताडीचे लायसन्स जरी दिले असले तरी ज्या ठिकाणी ताडेचे वृक्ष आहे ज्या ठिकाणी ताडी संदर्भात लागवड केली जाते त्या ठिकाणाहून ताडी पोहोचायला किती वेळ लागेल व किती टायमा संदर्भात ताडी पिण्या योग्य आहे नमुने वारंवार तपासणी साठी घेत असतात का असाही प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे. जवळपास एकही झाड ताडीचे नसताना रोजच्या रोज एवढे ताडी येते तरी कुठून या मागचे कारण पोलीस प्रशासन व अन्न औषध विभाग यांनी का शोधले नाही यामागे अन्न औषध वाल्यांचे चांगलेच आर्थिक देवाण घेवणीचे हात भिजलेले दिसून येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

मुक्ताईनगर शहरांमध्ये अवैध बोगस ताडी विक्री होत असून जीवाशी खेळणारा प्रकार हा होत आहे ताडी नेमकी कुठे बनवल्या जाते व कुठल्या स्वरूपात बनवली जाते हा प्रकार अद्यापही गुलदस्त्यातच बंद आहे. ताडी पिणारा व्यक्ती याने जर एकही दिवस ताडी नाही पिली तर त्याच्या शरीराचे अवयव शरीराच्या मधून  असे ताणले जात असून याचमुळे अवैध बोगस ताडीचे सेवन करायला ती ताडी भाग पाडत असते.  यामध्ये म्हशीच्या प्रजननाच्या वेळेस जे इंजेक्शन अथवा गोळ्या दिला जातात त्या इंजेक्शनचा व गोळ्यांचा वापर या ताडी मध्ये केला जातो. याचा आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत असल्याची बाब उघड आहे.

 

या सर्व प्रकारांची अन्न व औषध प्रशासनाने कठोर तपासणी करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी शहरातून करण्यात येत आहे.

Exit mobile version