Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुकेश अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या स्थानी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बर्कशायर हॅथवेच्या वॉरेन बफेट, गूगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आता संपूर्ण जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्स मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती ७० अब्ज डॉलर एवढी आहे.

 

 

फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंत १० व्यक्तींची यादी जाहीर केली. यात आशिया खंडातून केवळ मुकेश अंबानी यांना स्थान मिळाले आहे. ते या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७० अरब डॉलर झाली आहे. मागील २० दिवसांमध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास ५.४ अरब डॉलरची वाढ झाली. या संपत्ती वाढीनंतरच ते श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकवर पोहचले आहेत. काही दिवसांपूर्वीच २० जून रोजी आलेल्या फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानींचा क्रमांक ९ होता. फोर्ब्सची यादी संबंधित उद्योगपतीच्या व्यवसायातील शेअरच्या किमतीवरुन बनवली जाते. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर रॅकिंग्समध्ये संपत्तीचे मूल्यांकन शेअर्सच्या किमतींच्या आधारावर ठरवण्यात येते. रिलायन् इंडस्ट्रीजमध्ये अंबानी यांचे शेअर ४२ टक्के आहेत. आज शेअर्समध्ये जवळपास ३ टक्क्यांनी वाढले आहेत. याचे शेअर्सनी ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला आहे.

Exit mobile version