Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नामकरण ; सुवर्णकार समाजातर्फे आनंदोत्सव

 

जळगाव, प्रतिनिधी । मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नामकरण नाना शंकरशेठ टर्मिनस असे करण्यात आल्याबद्दल जळगावातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरा जवळ सुवर्णकार समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नाना शंकरशेठ टर्मिनस नामकरणासाठी ज्यांनी पाठपुरावा केला व महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत निर्णय घेतला त्यांचे जळगाव सोनार समाजाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील अग्रेसर संस्थेच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटुन आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, ऋणानुबंध वधुवर पालक समिती, कर्तव्य प्रतिष्ठान, जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संघ याचे पदाधिकारी व समाजातील संजय विसपुते, अरुण वडनेरे, विजय वानखेडे, संजय भामरे संजय पगार, योगेश भामरे, गोकुळभाऊ सोनार, शाम भामरे, इच्छाराम दाभाडे, दीपक सोनार,डॉ. विजय बागुल, भगवान दुसाने, विशाल विसपुते, नंदू बागुल, प्रकाश भामरे, शशी जाधव, उमेश विसपुते, बबलू बाविस्कर, कमलेश गंगापूरकर, विलास बाविस्कर, दीपक इखनकर, अश्विन सोनार, ईश्वर रणधीर,पंकज रणधीर,विनोद विसपुते, लक्ष्मीकांत उमराणेकर,बापू रणधिर, शंकर अहिरराव सह इतर समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version