Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसुफ मेमनचा कारागृहात मृत्यू !

नाशिक (वृत्तसंस्था) मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे.

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा युसूफ मेमनचा भाऊ आहे. दरम्यान, युसुफच्या मृत्यूमुळे अंडरवर्ल्ड जगतात खळबळ उडाली आहे. १९९३ चे बॉम्बस्फोट म्हणजे देशावरील पहिला दहशतवादी हल्लाच मानला जातो. अभिनेता संजय दत्तसह सीमाशुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस दलातील अधिकारीही बॉम्बस्फोटासाठी पाठविण्यात आलेला शस्त्रसाठा मुंबईत सुखरूप पोहोचविण्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आहेत.

Exit mobile version