Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई विमानतळावर ९ कोटींचं हेरॉईन जप्त

 

मुंबई :वृत्तसंस्था ।  एनसीबीच्या मुंबई झोनने मुंबई विमानतळावर एका दक्षिण आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली तिच्याकडे ३ किलो हेरॉईन हे अंमली पदार्थ सापडलं आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत नऊ कोटी रुपये आहे.

 

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

 

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना एका आंतरराष्ट्रीय तस्कर महिलेबाबत माहिती मिळाली होती.त्यांनी  पथकाला सक्रिय केलं होतं.  पथक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवून होतं.

 

 

ही महिला मुंबईहून जोहान्सबर्ग येथे जात होती. या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या सामानाची तपासणी केली असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या बागेत एक चोर कप्पा आढळून आला आणि तो चोर कप्पा उघडला असता त्यात दोन किलो हेरॉईन हे अंमली पदार्थ सापडलं. तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात एक किलो हेरॉईन सापडलं

 

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव खाणीयसिले प्रॉमिसे असं आहे. ती दक्षिण आफ्रिका देशाची नागरिक आहे. या महिलेला एनसीबी कार्यलयात आणून तिला अटक केली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Exit mobile version