Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई महापालिका विरोधी नेत्याची भूमिका स्वतंत्र लढण्याची

मुंबई : वृत्तसंस्था । सन २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, यासाठी शिवसेनेशी युतीची गरज नाही, असं मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवि राजा यांनी म्हटलं आहे. पण सध्या काँग्रेस आणि शिवसेना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा भाग आहेत.

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवेल असे संकेत दिले होते. मात्र, पालिकेतील काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणूका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात का? हे पहावं लागणार आहे.

स्थानिक राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास मुंबई महापालिकेतील काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाराजी आहे. कारण, राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे महापालिकेत शिवसेनेने ही आघाडी होऊ दिलेली नाही. स्थायीसह इतर समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेविरोधात लढत दिली होती. मात्र, यात काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते.

Exit mobile version