Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद: पोलिसांचा पहारा

मुंबई प्रतिनिधी । आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी मुंबई ते पुणे हा एक्सप्रेस वे बंद केला असून येथे पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.

काल रात्री जनता कर्फ्यू उठल्यानंतर मुंबई ते पुण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली. आज सकाळपासून या महामार्गावर अजून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी दिसून आली. या पार्श्‍वभूमिवर, दुपारी बाराच्या सुमारास हा महामार्ग बंद करण्यात आला. दोन्ही बाजूंनी ही मार्ग बंद करण्यात आला असून येथे पोलिसांचा पहारा लावण्यात आल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version