Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता

 

मुंबई :वृत्तसंस्था । लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दिल्लीत कोरोनाची लाट आली आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या आधीच दिल्लीत रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
दिल्लीत प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे, . दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसा ५००० हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

 

राज्यातही . मागील आठवड्यात दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. मागील दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात ५ हजार रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजीही ५ हजार ५३५ रुग्ण एक दिवसात आढळून आले.

Exit mobile version