Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई ते सिंधुदुर्ग मार्ग समृध्दी प्रमाणेच ‘एक्सप्रेस वे’ होणार : मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग-वृत्तसंस्था | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून येथील भाषणात त्यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

 

‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा मोठा कार्यक्रम आज कोकणात पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सावंतवाडीसाठी ११० कोटींच्या निधीची मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, आपल्या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत ही मोठी बाब आहे. मागील सरकारनं जे काही प्रकल्प थांबवले होते ते मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले.

 

केंद्राकडे मागितलेली १०० टक्के रक्कम लगेच मिळते, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव दिले जाईल. पर्यटन प्रकल्पाची एकही संधी सोडणार नसून समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.  याशिवाय चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव दिलं जाईल, अशी घोषणा देखील शिंदेंनी केली.

Exit mobile version