Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई-कलकत्ता मार्गावरील आरओबीचे नूतनीकरण तीन वर्षात पूर्ण करणार – डीआरएम गुप्ता


भुसावळ, प्रतिनिधी | मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा मुंबई-कलकत्ता या शहरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोण असल्यामुळे विभागातील या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग व आरओबीच्या नुतनीकरण आगामी तीन वर्षात करण्यात येणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सिनियर डीसीएम आर.के. शर्मा, अभियंता राजेश चिखले, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी उपस्थित होते.

डीआरएम गुप्ता यांनी पुढे सांगितले की, भुसावळ विभागात सौर उर्जा परियोजने अंतर्गत रेल्वे मार्गाजवळील रेल्वेच्या जागेवर सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी विभागातील मुर्तीजापूर, अकोला किवा इतर ठिकाणी योग्य असलेल्या जागांची चाचपणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. गाड्यांची गती १६० किमी प्रती तास वेगाने होणार असून सद्या ते नियोजन १३० किमी प्रती तासानुसार सुरु आहे. ती वाढविण्यासाठी विभागातील सिग्नलिंगसाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्षभरात सर्वच पॅसेंजर गाड्यांचे मेमू गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात येईल व मेेमू कारशेडची निर्मिती सप्टेंबर २०२१ पर्यंत होणार याशिवाय धुळे-नरडाणा या ५० कि.मी.नवीन मार्ग. भुसावळ- जळगाव दरम्यान तीसर्‍या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी ६५ कोटी. इंदुर-मनमाड नवीन मार्ग, मनमाड जळगाव थर्ड रेल्वे लांईन २०५ कोटी यासह विविध विकास कामें व सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतून अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विभागातील भुसावळ, जळगाव, बर्‍हाणपुर, अकोला, मकापूर, शेगाव, नाशिक मनगाड, नांदगाव याठिकाणच्या रेल्वे जागा वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने जागांवर संरक्षण भिंती तयार करण्यात येत आहे. यापूर्वी १२ ते १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून आगामी काळातही तेवढाच खर्च करण्यात येणार आहे .

Exit mobile version