Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार; गणेशोत्सव समन्वय समितीचा निर्णय

मुंबई वृत्तसंस्था । आगामी होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचा सावट राहणार असले तरी उत्सव साधेपणाने साजरा होणार आल्याची निर्णय मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतला आहे. अनेक वर्षांपूर्वी राज्यात सर्वत्र प्लेगची साथ असताना, लोकांनी अक्षरशः घरातील गणरायाच्या छोट्या मूर्ती, फोटो पुजल्याच्या आठवणींना उजळा देत मुंबईकरांनी विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मानसिक तयारी करावी, असे आवाहन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थिती सध्या दिवसेंदिवस बिकट होत असून,तिचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील संचारबंदी कधी शिथिल होईल,याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये चलबिचल सुरू आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होते हे सर्वश्रुत आहे. प्लेगची साथवगळता गणेशोत्सव काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. मात्र, मुंबईचा गणेशोत्सव नेहमीच थाटामाटात साजरा झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र, यंदा करोनाने जगभर घातलेला धुमाकूळ पाहता, एकूणच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे. अनेक नामांकित मंडळांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असली, तरी अनेक छोट्या मंडळांकडून, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मूर्तीबाबत विचारणा केली जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

गतवर्षीची अतिवृष्टी असो वा २६ जुलैचा महापूर, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. यंदाही ही परंपरा मंडळांनी कायम राखली आहे. मागील काही दिवसांत पालिका, पोलिस यंत्रणेवर अधिक ताण आहे. अशावेळी ऐन गणेशोत्सवात याच सामाजिक जाणिवेतून गर्दी टाळण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत,’ असे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

Exit mobile version