Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक निवडून आले पाहिजेत : अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) सध्याच्या घडीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक आहेत. ही संख्या ५० ते ६० पर्यंत वाढली पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.

 

बई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज दिवसभर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ नवाब मलिक निवडून आले. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती बदलायला पाहिजे. मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान १० आमदार निवडून आले पाहिजेत. तसेच सध्याच्या घडीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक आहेत. ही संख्या ५० ते ६० पर्यंत वाढली पाहिजे. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. वॉर्डात काम केले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. महिन्यातला एक दिवस मुंबईला देणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version