Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत डॉक्टरकडून कोरोनाबाधित रूग्णावर लैंगिक अत्याचार; पोलीसात गुन्हा

FIR

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयात करोनाग्रस्त पुरूषावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला आहे. आरोपी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी डॉक्टरही करोनाग्रस्त असल्याच्या संशयामुळे पोलिसांनी अद्याप डॉक्टरला अटक केलेली नाही. त्या डॉक्टरला ठाणे येथील त्याच्या राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली आहे. १ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे आरोपी डॉक्टरचा तो कामावरील पहिलाच दिवस होता. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३० एप्रिल रोजीच हा डॉक्टर रुग्णालयात रुजू झाला होता.

रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरोधात आयपीसी कलम ३७७, २६९ आणि २७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘१ मे रोजी १० व्या मजल्यावरील आयसीयूमधील रुग्णाच्या रुममध्ये आरोपी डॉक्टर गेला. त्यानंतर आरोपी डॉक्टरने रुग्णासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा रुग्णाने विरोध केला आणि जवळील अलार्म वाजवला. त्यानंतर रुमबाहेर असलेले कर्मचारी तातडीने आतमध्ये आले’, असे तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version