Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत ‘चेस द व्हायरस’ मोहीम हाती घेतलीय : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत ‘चेस द व्हायरस’ मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फेज २ आणि ठाण्यातील कोविड रुग्णलाचे इ-लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील बीकेसी फेज २ कोविड रुग्णालयामुळे अधिकच्या एक हजार रुग्णखाटा उपलब्ध होतील. यात १०८ आयसीयु खाटा तर २० डायलिसिस आणि ५०० ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे. तसेच ठाण्यातही तब्बल २४ दिवसात कोविड रुग्णालय उभारण्याचा विक्रम केला आहे. या रुग्णालयातही आयसीयु, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. आरोग्य सुविधा उभारण्यात आणि औषधांच्या वापरात आपण जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे आहोत. यात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनमधली योग्य उपाय योजनांमुळे धारावी आणि मालेगावचा कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यात सरकारला यश आले असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version