Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत घरोघरी तूप विकणाऱ्या तरुणीवर सामुहिक बलात्कार !

 

नवी मुंबई (वृत्तसंस्था) घरोघरी तूप विकणाऱ्या एक तरुणीवर नवी मुंबईत सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीवर पहिले रिक्षावाल्याने आणि त्यानंतर दुचाकीस्वारांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, घाटकोपर रेल्वे स्थानकातून लोकल पकडताना घरोघरी तूप विकणाऱ्या 19 वर्षीय पीडित तरुणीची तिच्या नातेवाईकांपासून ताटातूट झाली. यानंतर नातेवाईकांना शोधत असतांना पिडीत तरुणीकडचे पैसे संपले. त्यामुळे तिने आपल्या अंगावरील सोन्याचा एक दागिना विकून देण्याची दिवा रेल्वे स्थानकातील वृद्ध भिकारणीला विनंती केली. त्यानंतर भिकारणीने तिला महापे येथील झोपडपट्टीतील घरी नेले. मात्र सोन्याचा दागिना शक्य न झाल्याने भिकारीन राहत असलेल्या झोपडपट्टीमधून निघाली. पुढे एका चौकात तिने रिक्षावाल्याने जवळपास असणाऱ्या रेल्वे स्थानकावर नेण्याची विनंती केली. पीडिता ही एकटी असल्याचे पाहून रिक्षावाल्याने महापे परिसरातील पडीक ईमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे सोन्याचे कानातले, नाकातील सोन्याच फुलं आणि पायातील चांदीचे पैंजण जबरस्तीने काढून घेतले. त्यानंतर तिला राम मंदीर परिसरात सोडून रिक्षावाला पळून गेला. या घटनेनंतर रात्री 12च्या सुमारास अॅक्टिवावरून जाणाऱ्या दोन मुलांनी तिला स्टेशनवर सोडतो, असे सांगत तिला ट्रिपल सीट बसवले. तसेच घणसोली रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेऊन पुढे ठाणे बेलापूर मार्गावरील पाईपलाईन शेजारी नेले. यावेळी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Exit mobile version