Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईतील डॉक्टर तीन वेळा कोरोना पॉझिटिव्ह

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुलुंडमधील एक २६ वर्षीय डॉक्टर जून २०२० पासून तीनवेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. चिंतेची बाब म्हणजे यावर्षी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डॉक्टर दोनदा पॉझिटिव्ह आढळली.

 

आतापर्यंत तीन वेळा पॉझिटिव्ह आढळलेल्या डॉ सृष्टि हलारी म्हणाल्या वारंवार रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्या भ्रमित झाल्या आहेत

मुंबईमधील संसर्गासंदर्भात जिनोम सिक्वेन्सिंग ( विषाणूच्या रचनेमधील बदल आणि जडणघडण) अभ्यास करण्याच्या उद्देशाने सध्या वेगवेगळ्या भागांमधील नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर सृष्टी यांचा स्वॅबही घेण्यात आला आहे. अशाप्रकारे पुन्हा पुन्हा संसर्ग होणं हा खरं तर गोंधळात टाकणारा प्रकार असल्याचं डॉ. सृष्टी हलारी सांगतात.

 

लसीकरणानंतरही डॉ सृष्टि यांना संसर्ग कसा झाला, याची तपासणी करण्यासाठी स्वॅब गोळा करण्यात आला आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये बीएमसीने आणि खासगी रुग्णालयात सॅंपल देण्यात आले आहेत. संसर्गाचे कारण शोधण्यात येत आहे. बीएमसी कोविड सेंटरमध्ये कार्यरत असताना डॉ. हलारी १७ जून २०२० रोजी पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर यावर्षी २९ मे आणि ११ जुलै रोजी त्यांना संसर्ग झाला.

 

डॉ. सृष्टीवर उपचार करत असलेले डॉक्टर मेहुल ठक्कर म्हणाले, ‘मे महिन्यात झालेला दुसरा संसर्ग जुलैमध्ये पुन्हा सक्रिय झाला असावा. एफएमआरचे संचालक डॉ. नर्गिस मिस्त्री म्हणाले की, कदाचित कोरोनाचा नवीन प्रकार समोर येत असेल.

 

 

Exit mobile version