मुंबईतच होणार विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन

मुंबई प्रतिनिधी | राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे घेण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. येत्या २२ ते २८ डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असून, सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे, त्यातच या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हिवाळी अधिवेशन हे प्रथा आणि परंपरेनुसार दरवर्षी नागपूरला होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव ते मुंबईत घेण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अधिवेशनात सहभागी होणार्‍या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचार्‍यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेय. त्यामुळे अधिवेशनासाठी येणार्‍या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.

Protected Content