Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंदडा नगरातील विवाहितेला पैशांची मागणी करून छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुंदडा येथील विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण करून दमदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २६ मे रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरात मुंदडा नगरातील माहेर असलेल्या मयुरी मोहन तोंडे यांचा विवाह पुणे कोथरूड येथील मोहन बबन तोंडे यांच्याशी सन २००७ मध्ये रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती मोहन याने विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेचे पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण करून शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. या मारहाण व छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या.. त्यानंतर शुक्रवारी २६ मे रोजी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेच्या फिर्यादीवरून पती मोहन बबन तोंड, सासरे बबन वाघु तोंडे, सासू आशाबाई बबन तोंडे आणि दिर किरण बबन तोंडे सर्व रा. कोथरूड पुणे यांच्या विरोाात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Exit mobile version