Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंडेंवर आरोप करणारी महिला पुन्हा पोलीस स्थानकात

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली महिला पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात दाखल झाली असून त्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

रेणू शर्मा या महिलेने काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर आज त्यांनी डी.एन. नगर पोलीस स्थानक गाठले असून त्या सहाय्यक पोलिस आयुक्तांची ती भेट घेणार आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. आता दुसर्‍या पोलीस स्थानकात येऊन त्या नेमके काय करणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version