मुंगसे येथे कुत्र्याच्या हल्यात काळवीट जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुंगसे गावा जवळच असलेल्या शेतात बुधवारी नऊ वाजेच्या सुमारास काळवीटवर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. या जखमी अवस्थेत पडलेल्या काळवीटला मुंगसे ग्रामस्थांनी पाणी पाजून जीवदान दिले.

 

मुंगसे गावाजवळील शेतात बुधवार दि. १ जून रोजी कुत्र्याच्या हल्ल्यात काळवीट जखमी झाले ह्तोये. या जखमी झालेल्या काळवीट बाबत पारोळा वन विभागाचे वनपाल दिपक पाटील यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱी ज्ञानेश्वर पाटील. तासखेडा व अधिकार पारधी कुर्हा यांना घटनास्थळी पाठविले. यावेळी ग्रामस्थांनी जखमी काळवीट त्यांच्या स्वाधीन केले. जखमी काळवीटला अमळनेर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठवले. नंतर त्यांच्यावर उपचारासाठी दाखल करण्यात आले. याकामी मुंगसे येथील पत्रकार भानुदास पाटील. पोलीस पाटील भरत निकुंभ, लिलाधर पाटील, भटु कोळी आदींनी सहकार्य केले.

Protected Content