Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मिरचीची पुड टाकून व्यावसायिकावर चाकू हल्ला; ६० हजाराची रोकड लांबविली

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराकडे दुचाकीने जाणाऱ्या व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर येवून चाकूने हल्ला करून साठ हजाराची रोकड लांबविल्याची घटना खामगावातील टॉवर चौकात घडली आहे. चाकूहल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे खामगावात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खामगावात गेल्या दोन दिवसांपासून चोरीच्या घटना घडत असतांना सोमवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकातून व्यवसायिक अशोक आयलाणी हे दुचाकीने घरी जात असतांना अज्ञात हल्लेखोर जवळ येवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून चाकूने हल्ला केला व त्यांच्या हातातील ६० हजाराची रोकड घेवून लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना टावर चौकातील सकळकळे कॉम्प्लेक्स ते जोशी बिल्डींगपर्यंत घडली. विशेष म्हणजे सदर घटना परिसरातील ५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान अशोक आयलाणी यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केल्यानंतरही त्यांनी व्यवसायकाने त्या चोरट्याचा जखमी अवस्थेत पाठलाग केला.

अशोक आयलाणी हे आठवडी बाजारातील देशीदारूचे दुकान बंद करून घराकडे निघाले. त्यांच्याकडे पैशाची थैली होती. आपल्या स्कुटीने घराकडे जात असताना प्रकाश मुंधडा यांच्या घरासमोर असलेल्या अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात आरोपीने आयलाणी यांच्यावर चाकुने हल्ला रोकड लांबविली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार त्रिभुवन व पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आयलाणी यांच्या मित्र परिवारातील सदस्यही दाखल झाले. आयलाणी यांच्यावर खामगाव सिल्वरसिटी रूग्णालयात उपचार होवून त्यांच्या हाताला तिन टाके लावण्यात आले. पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अशोक आयलाणी हे अॅक्टीव्हा क्र. (एमएच २८ बीएन ०१६१) ने जात असताना अज्ञात आरोपी मोटारसायकलने पाठीमागून पुढे येवून त्यांची गाडी थांबवून शिवीगाळ करून ‘तेरे पास की बॅग मुझे दे’ असे म्हणाला. आयलाणी यांनी बॅग देण्यास नकार दिल्याने तोडावर मिर्ची पावडर फेकली व उजव्या हाताच्या मनगटावर चाकू मारून पिशवी जबरीने हिसकावून पसार झाला. खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश सरदार हे करीत आहेत.

Exit mobile version