Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मिथुन चक्रवर्तीं भाजपमध्ये जाणार ?

 

 

मुंबई : प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने ते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.

 

रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईत अचानक भेट घेतली. मिथुन यांच्या मुंबईतील निवासस्थानी  सकाळी सरसंघचालक गेले आणि त्यांनी मिथुन यांच्याशी दीड तासाहून अधिक वेळ चर्चा केल्याने  राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

मोहन भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होते. मात्र २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला होता. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिथुन यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तीला भाजपमध्ये घेऊन ममतांना पायउतार करण्याचे भाजपचे मनसुबे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Exit mobile version