Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मित्रासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यावर पतीकडून पत्नीची हत्या !

 

रावेर : प्रतिनिधी । मित्रासोबत   आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यावर पतीने  पत्नीची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विवाहितेची वडील चमार दलसिंग बरेला (  रा – गारबर्डी ) यांच्या फिर्यादीवरून आरोपी  पती साधू मानसिंग बारेला (वय 35 ,रा पालबर्डी ) व त्याचा मित्र भायला भंगा बारेला ( पिंपळखुटा , ता.जि. खांडवा , मध्य प्रदेश ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे .सायजाबाई बारेला ( वय 30 वर्ष , रा- पालबर्डी ) असे मयत महिलेचे नाव होते . 

काल पाल बर्डी येथे आरोपी पतीच्या घरांत  मृतक, दोन्ही आरोपी घरीच दारू पित होते , या महिलेच्या पतीला त्याच्या मित्राने दारू आणण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठविले त्यांच्या मुलीला 20 रुपये देऊन दुकानात गोळी/चॉकलेटसाठी पाठविले त्यानंतर दारू घेऊन आलेल्या  पतीला मित्र आणि पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते 

ते पाहून आरोपी पतीने पत्नीस काठीने हातावर, पायावर, बरगडीवर गंभीर मारहाण केली  या मारहाणीत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला . या दोन्ही आरोपींविरोधात भा द वि कलम-302, 376, 452   प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे . पळून गेलेला आरोपी  भायला बारेला याला पोलिसांनी  पिंपलखुटा ( ता.जि. खांडवा , मध्य प्रदेश ) येथे जाऊन अटक केली आहे  पुढील तपास पो नि रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  नाईक, पोलीस उपनिरीक्षक  अनिस शेख व वाघमारे, हे कॉ राजेंद्र राठोड, पो ना महेंद्र सुरवाडे, पो कॉ सुरेश मेढे, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, मंदार पाटील,  पुरुषोत्तम पाटील, श्रीराम कांगणे, नरेंद्र बाविस्कर, संदीप धनगर, अतुल तडवी,  सचिन घुगे, कुणाल पाटील करीत आहेत 

 

Exit mobile version