Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मास्क लावा’ सांगितल्याच्या रागातून फळविक्रेत्यांनी उगारला हात

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मास्क लावण्याचे सांगितल्याने राग आल्याने प्रांताधिकारी यांच्या वाहनचालकावर फळविक्रेत्यांनी हात उगारल्याची घटना आज येथे घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरानाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूची जनजागृती वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. या पार्श्वभूमीवर फैजपूर प्रांताधिकारी थोरबोले हे आज रावेर शहरात फिरून मास्क लावण्याचे आवाहन करत होते. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात काही फळविक्रत्यांनी मास्क न लावल्यामुळे त्यांना देखील मास्क बांधा असे प्रांत यांनी सांगितल्यानंतर दोघांमध्ये शब्दीक चकमक झाली. दरम्यान प्रांताधिकारी यांचा गाडीचा चालक देखील समजविण्याचा प्रयत्‍न करत असतांना फळविक्रेत्यांना राग आल्याने चालकावर हात उगारल्याचा प्रकार आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रावेर पोलिसात फळविक्रेते तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Exit mobile version