Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा ; राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी ।कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वानी मास्क वापरणे गरजेचे असतांना काही नागरिक मास्क न लावता फिरतांना दिसत आहे अशा नागरिकांवर जळगाव महापालिकेने बृहमुंबई महानगपालिके प्रमाणे दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्र्वादीतर्फे करण्यात आली आहे.

जळगाव मनपाने ही ब्रुहनमुंबई मनपाने ज्याप्रमाणे मास्क न लावल्यास १००० रू. दंड आकारण्याचा उपक्रम राबवीला आहे . तसाच उपक्रम जळगाव मनपा ने ही राबवावा अशी मागणी केली आहे. जळगावमध्ये कोरो पॉझिटिव्ह चे प्रमाण कमी असल्या मुळे लोकांमध्ये या बाबतची गंभीरता पाहीजे त्या प्रमाणात दिसत नसल्याने या दंडाच्या उपक्रमामुळे लोकांमध्ये या महामारीच्या संदर्भात गंभिरता निर्माण होईल व शहर कोरोना मुक्त करण्यास या उपक्रमाद्वारे मोठा हातभार लावू जे या परीस्थीती अत्यंत महत्वाचे आहे असे निवेदन आयुक्त सतीश कुलकर्णी यांना मेलद्वारे केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्षर वींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी अर्बन सेल जिल्हाध्यक्षअश्विनी देशमुख , राष्ट्रवादी अर्बन सेल समन्वयक मुविकोराज कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ममता सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version