Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मासूमवाडी येथे सासरच्या मंडळींनी जावयाला झोडपले

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मासुमवाडी असरारनगरातील २८ वर्षीय तरूणाचा घटस्फोट झाला असून पत्नीला खावटीचा खर्च देण्यावरून सासरच्या मंडळींनी पुर्वश्रमीच्या जावंयाला लाठ्याकोठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २६ मार्चरोजी सायंकाळी घडली एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

शहरातील मासुमवाडी आसरारनगरातील असद रशिद देशमुख (वय-२८) याची  पत्नी तब्बस्सुम सोबत फारकत झालेली आहे. असद यांची पत्नी तबस्सुम यांच्या सोबत फारकतचे प्रकरण न्यायालयात असुन खावटी द्यावी यासाठी सासरची मंडळी काल त्यांच्या घरी आली. पंधरला लाख रुपये एकत्रीत देऊन टाकावे म्हणुन वाद होउन पत्नीसह सासरच्या मंडळींनी लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

 

जखमीच्या तक्रारीवरुन आकीब समशेर पटेल, जुनेद संजु पटेल (रा. दुधफेडरेशन जळगाव), संजु पटेल, तब्बस्सुम असद देशमुख यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलिंद सोनवणे करीत आहे.

Exit mobile version