Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालाचे पैसे मागितल्याने गोळी मारण्याची धमकी

crime-2

 

 

 

 

जळगाव  : प्रतिनिधी । उधारीवर खरेदी केलेल्या मालाचे पैसे मागितले म्हणून वसुलीसाठी जळगावात आलेल्या उत्तर प्रदेशातील दाम्पत्याला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

शहरातील दूरदर्शन टॉवर परिसरात रहिवासी खान्देश क्राँकरीच्या मालकाने उत्तर प्रदेशातील शिका इंडस्ट्रीज या कंपनीकडून क्रॉकरीचा माल मागवला होता. या मालाचे पैसे मागितले असता हारुण कुटूंबियांनी शिखा इंडस्ट्रीजच्या मालक शिखा नीरज अग्रवाल वय ४४ व त्यांचे पती नीरज अगरवाल या दोघांना गोळी मारण्याची धमकी दिल्याची घटना आज सोमवारी समोर आली आहे.

 

एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथील पंचवटी कॉलनी येथे शिका अग्रवाल यांची शिखा इडंस्ट्रीज नावाने क्रॉकरीची कंपनी आहे.  या कंपनीकडून काही दिवसांपुर्वी   जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवर येथे राहणार्या खान्देश क्रॉकरीचे अल्तमश सईद  हारुण यांनी माल मागविला होता. या मालाचे पैसे घेण्यासाठी ४ एप्रिल रोजी शिखा अग्रवाल या पती नीरज अग्रवाल यांच्यासोबत जळगावात आल्या.  यानंतर शिका अग्रवाल यांनी खान्देश क्रॉकरी गाठले. याठिकाणी फैजल सईद हारुण व सईद हारुण या दोघांना शिखा अगरवाल यांनी मालाच्या पैशांची मागणी केली. त्याचा राग आल्याने फैजल हारुन व सईद हारुण या दोघांनी शिखा यांच्यासह त्यांच्या पतीला शिवीगाळ केली  पोलिसांत गेले तर रस्त्यात गोळी मारुन देवु , जळगावातून वापस जाऊ देणार नाही तुमचे पैसे देणार नाही तुम्हाला जे करायचे ते करा अशी धमकी दिली. याचवेळी अल्तमश सईद हारूण यानेही अग्रवाल दाम्पत्यांना शिवीगाळ करून याठिकाणी पुन्हा यायचे नाही अशी धमकी  दिली.  अशा आशयाची तक्रार शिखा नीरज अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून फैजल सईद हारून सईद हारून व अल्तमश सईद हारुण (सर्व रा खान्देश क्रॉकरी दूरदर्शन टॉवरसमोर  भुसावळ रोड जळगाव) या तिघांविरोधात आज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील   करीत आहेत.

Exit mobile version