Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालमत्तेच्या वाटणीसाठी २ मुलांचा पित्यावरच हल्ला !

 

 

चाळीसगाव : प्रतिनिधी । मालमत्तेच्या वाटणीसाठी २ मुलांनी  पित्यावरच हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील  टाकळी प्र.चा. येथे घडली

 

औषधोपचार करून बरे झालेले पिता रामभाऊ फकिरा पाटील ( वय- 66 , धंदा-शेती (पैशनर), रा. शिवशक्तीनगर, टाकळी,  प्र.चा. ता.चाळीसगाव ) यांनी शहर पोलीस ठाण्यात  दाखल केलेल्या  फिर्यादीत म्हटले  आहे की , ते टाकळी येथे  पत्नी सौ.मंगलाबाई, मुले  नरेंद्र, महेश , कपील व सुना  सोनल, सपना आणि जयश्री तसेच नातवंडांसह राहतात .  शेती व   पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह  चालतो . नरेंद्र शेती करतो  कपील  काही कामधंदा करत नाही.

 

सर्व कुटुंबीय  संपत्तीचा वाटा-हिस्सा पाडून  त्यांच्या नावे संपत्ती करावी म्हणुन नेहमी भांडण करीत असतात असे त्यांनी पोलिसांना सांगितले . 5 जुलैरोजी रात्री ते घरासमोर गेटजवळ बसले असतांना कपीलने दारुच्या नशेत येवुन येवुन  शिवीगाळ केली  त्यास समजावीत असतांना त्यांने रामभाऊ पाटील यांच्या डाव्या हातावर लोखंडी रॉड मारुन  दुखापत केली. त्यानंतर घरातुन नरेंद्र आला व त्यानेही  कपील यास न आवरता लोखंडी कोयता उजव्या हातावर मारून दुखापत  केली  आमचे नावे संपत्ती केली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी  धमकी देत कपिलने शिवीगाळ केली. या  भांडणातुन दिपक राजपूत, रावसाहेब साळुखे, संजय सोनार यांनी  सोडवा-सोडव केली

 

त्यानंतर रामभाऊ पाटील यांनी  डॉ.जितेश शिंदे यांचेकडे  औषधोपचार केले .  औषधोपचार पूर्ण झाल्यावर आज त्यांनी ही  फिर्याद  दाखल केली  या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी  भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

Exit mobile version