Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारूळ येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढू नका

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथील  गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या न्यायालयाच्या आदेशान्वये महसूल प्रशासनाने आदेश पारित केले आहेत.  परंतु,हे अतिक्रमण काढण्यात येवू नये अशी मागणी मारुळ गावाचे  सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष असद अहमद जावेद अहमद सैय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

उच्च न्यायालया मुंबईच्या जनहित याचिकेद्वारे आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नगर परिषद , पंचायत समिती व ग्राम पंचायत हद्दीतील गावातील गायरान जमिनीवरील झालेले अतिक्रमण हटविण्या संदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.  महसुल प्रशासनाच्या वतीने आदेशाच्या अनुषंगाने मौजे मारुळ ता. यावल येथील गट कमांक २१ नदीपार कडील झोपडपट्टी ,बेघर वस्तीमध्ये राहाणाऱ्या अनु. जाती/जमाती व अल्पसंख्याक समाजातील नागरीकांचे अनेक वर्षापासुन या ठिकाणी वास्तव्य असलेल्या या न्यायालयाच्या आदेशाने गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश पारित करण्यात आले. परंतु, सदरचे अतिक्रमण काढण्यात येवु नये या संदर्भात मारुळ गावाचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष असद अहमद जावेद अहमद सैय्यद,  म.प.सह. सोसायटीचे चेअरमन मसूरुरअली सैय्यद,   सुलतान पटेल ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य सिताराम पाटील, अमीर तडवी,  साहेबअली सैय्यद,बाळू   तायडे, इमरान सैय्यद या शिष्टमंडळाने सदरचे अतिक्रमण हटवण्यात येऊ नये यासंदर्भातील विनंती निवेदन यावलचे तहसीलदार महेश पवार यांना दिले  आहे.  यावेळी नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले.

Exit mobile version