मारूळ येथील गटारींच्या निकृष्ट कामाच्या चौकशीला टाळाटाळ ! : आंदोलनाचा इशारा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथे सुरू असलेल्या भुमिगत गटारीच्या निकृष्ट बांधकामाची रिपाइंच्या तक्रारीनंतर देखील चौकशीला टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी पंचायत समितीच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मारूळ तालुका यावल येथील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )च्या तालुका अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष राजु रमजान तडवी यांनी या गटारींच्या होत असलेल्या कामाबाबत गटविकास अधिकारी यावल कडे मागील२० दिवसापुर्वी लेखी तक्रार दिली होती . सदरच्या तक्रारी नंतर देखील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कामाची साधी पाहणी देखील केली नसल्याने यावल पंचायत समितीच्या या दुर्लक्षीत व भोंगळ कारभाराबद्दल राजु तडवी यांनी संत्पत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

मारूळ येथील पंचायत समितीच्या माध्यमातुन बांधण्यात आलेल्या भूमिगत गटारीचे बांधकाम सुरू असून सदरच्या बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट प्रतिचा असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांने गट विकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली होती. रिपाई (आठवले गट) च्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष राजू रमजान तडवी यांनी सदर ठेकेदाराच्या निकृष्ट कार्यपद्धतीमुळे शासनाच्या लाखो रुपयांचे विधी हे पाण्यात जाणार असल्याचा सुचना देखील तक्रारीत केली होती.

वरिष्ठ पातळीवरून या कामाची चौकशी करून काम गुणवत्ता पूर्ण शासकीय अंदाज पत्रकानुसार काम नसेल तर संबधीत ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पातळीवरून तात्काळ या कामाची चौकशी केली नाही तर पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईचे अल्पसंख्यांक विभामाचे तालुका अध्यक्ष राजु रमजान तडवी यांनी दिला आहे.

Protected Content