Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारूळ परिसरात टेलीकॉम कंपन्याच्या सेवेत अडथळा – ग्राहकांमध्ये नाराजी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ गावात मागील काही दिवसापासून सर्वच टेलीकॉम कंपन्याच्या टाॅवरची रेंज मिळत नसल्याने मोबाईल ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या टेलीकॉम कंपन्यानी आपली सर्व्हिस मध्ये सुधारणा करावी अशी मागणी परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहेत.

 

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले सुमारे १६ सोळा हजार लोकवस्तीच्या मारूळ या गावात हजारो नागरीक हे मोबाइल सेवेचा वापर करतात. मागील अनेक दिवसापासून सर्व कंपन्याच्या सिमकार्डाची रेंज मिळत नसल्याने मोबाइलक ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. आजच्या परिस्थितीत संगणकीय प्रणालीच्या युगात मोबाइल हे सर्वात महत्वाचे यंत्र दळणवळणाचे एक प्रमुख साधन बनले आहे. प्रत्येक नागरीकाजवळ मोबाइल आहे. मात्र, मारूळ तालुका यावल या गावात हजारो मोबाइल यंत्र युर्जस आहेत. मात्र, तांत्रीक अडचणीमुळे किंवा अनियमित विद्युत पुरवठामुळे रेंज मिळत नसल्याने अनेक तास मोबाइल यंत्र बंद अवस्थेत राहतात. त्यामुळे, मोबाइल ग्राहकांच्या अनेक कामांसाठी संपर्क अभावी अडचणी निर्माण होत आहे. या सर्व समस्याकडे संबंधीत टेलीकॉम कम्पन्यांनी तात्काळ आपल्या ग्राहकांच्या समस्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मारूळ व गावाच्या परिसरातील मोबाइल ग्राहकांकड्डन व्यक्त करण्यात येत आहे.

 

Exit mobile version