Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारुळ येथे महावितरणतर्फे “एक गाव एक दिवस’ अभियान उत्साहात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथे महावितरण कंपनीच्या वतीने “एक गाव एक दिवस’ अभियानाअंतर्गत गोरगरीब जनतेच्या घरांमधील अंधार दूर व्हावा यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे हे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या घरांमधील अंधार दूर होऊन जीवनमान प्रकाशमय व्हावे. व त्यांचा आर्थिक विकास स्तर उंचवावा या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी “डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना” ही महाराष्ट्र राज्य महावितरण विज मंडळाच्या मार्फत यशस्वीपणे राबविली जात आहे. सदर योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील ३१२ कुटुंबांना महावितरणच्या माध्यमातुन नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आले. सावदा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता जी.टी सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आर .टी .फिरके, न्हावी झोनचे सहाय्यक अभियंता धनंजय चौधरी या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर” डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना” ही गोरगरीब जनतेसाठी प्रभावशाली ठरले आहे.

यावेळी सरपंच असद अहमद जावेद अली सय्यद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सद्यस्थितीला निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारी महाराष्ट्र शासनाची “शेतकरी कृषी योजना” ही वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती वीज पंपावरील विज बिला मध्ये सप्टेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२२पर्यंतच्या शेती पंपावरील एकूण बिलांमध्ये ५०% शेती वीज बिले शेतकऱ्यांना माफ करण्यात येत आहे. सदर योजनेचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फैजपूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर .टी फिरके यांनी सांगितले. गावातील नागरिकांनी नवीन घरगुती वीज कनेक्शन मागणी केल्या नुसार गावात प्रत्यक्षात फिरून पाहणी करून आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी नवीन १८ विद्युत पोल उभे करून व नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आले. व एक नवीन ट्रांसफार्मर बसविण्यात आले. बुद्ध नगरी भागामध्ये नवीन अठरा विद्युत पोल वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी कामे प्रस्तावित आहे. गावातील नागरिकांच्या किरकोळ स्वरूपाच्या बारा तक्रारींचा जागेवरच निपटारा केल्याचे न्हावी झोनचे सहाय्यक अभियंता धनंजय चौधरी यांनी यावेळी माहिती दिली. दरम्यान संजय तायडे या नवीन विज ग्राहाकाला मान्यवरांच्या हस्ते घरगुती विज मिटरचे वाटव करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच असद सय्यद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील नरेश मासोळे ,फैजपूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. टी. फिरके, सहाय्यक अभियंता एच एन पाटील ,धनंजय चौधरी , हैदर अली सय्यद, बिलिंग विभागाचे के. बी. सोनवणे, ग्रा.पं सदस्य मुर्तजाअली सय्यद मतीउर रहमान पिरजादे , मुखतारउद्दिन फारुकी , सिताराम पाटील , हिरामण पाटील , सुरेश पाटील , युवराज इंगळे ,माजी ग्रा.पं.सदस्य बाळू तायडे, मारूळचे पत्रकार साहेब अली सय्यद विद्युत सहाय्यक श्री भूषण मेढे तायडे , कापडे , कासिफ सय्यद जकीउद्दीन फारुकी सर्व विद्युत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हैदर जनाब यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळू तायडे यांनी मानले.

Exit mobile version