Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारहाणीचा व्हिडीओ व्हारयल; बसचालकाला तिघांकडून मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव डेपोच्या बसने दुचाकीला ओव्हर टेक केल्याने दुचाकीवरील तिघांनी बसचालकाची कॉलर पकडून कॅबिनमधून ओढून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तर  सोशल मीडियात बसचालकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत असल्याचे आज समोर आले आहे.

 

या संदर्भात जाणून घेतले असता हा व्हिडिओ चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.

 

अधिक माहिती अशी की, आबा लक्ष्मण नालकर रा. सिंधी ता.चाळीसगाव हे चाळीसगाव बस डेपोमध्ये बसचालक म्हणून नोकरीला आहे.  १६ जुलै चाळीसगाव-कुंझर बस क्रमांक (एमएच २० डी ९८०६) दुपारी ४ वाजता चाळीसगावहून कुंझरला जाण्यासाठी निघाली. शहरापासून पुढे धुळे रोडवरील विराम गार्डनजवळ बसच्या पुढे दोन दुचाकी डबल सीट जात होत्या. त्यावेळी चालक आबा नालकर यांनी दोन्ही दुचाकींना ओव्हरटेक करत बस पुढे नेली. याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांनी भोसर फाट्याजवळ बस आडवून थांबवली. त्यातील एकाने “तू आमच्या मोटरसायकलला ओव्हरटेक का केले] असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. “तू दहिवद गावाजवळ ये तुला पाहून घेतो’ अशी धमकी देऊन पुन्हा दुचाकीवर बसून पुढे निघून गेले. दरम्यान बस चालकाने प्रवासींना उतरवून दहीवद गावाजवळ आल्यानंतर पुन्हा या तिघांनी बस थांबवून चालक आबा नालकर यांना कॉलर पकडून बस कॅबिनच्या बाहेर ओढत बेदम मारहाण केली. यात नालकर हे गंभीर जखमी झाले. बसमधील वाहक सचिन मदनदास बैरागी व प्रवाशांनी आवराआवर केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेबाबत चालक आबा नालकर यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नवल भीमराव पवार, भाईदास सुभाष बोरसे, यशवंत उर्फ सनी भीमराव पवार तिन्ही रा. दहिवद ता.चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहुणबारे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Exit mobile version