Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारवड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिला आनोखा निरोप समारंभ

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल फुला यांची बदली पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झाली आहे. मारवड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांची घोड्यावर मिरवणूक काढून कायम त्यांच्या स्मरणात राहील असा अनोखे पद्धतीने निरोप दिला.

सर्वसाधारणपणे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात  फारसे पटत नसते;परंतु काही माणसे त्यांच्या कामाच्या वेगळ्या कार्यशैली मुळे अनेकांना आपलेसे करतात.नेमकी हीच काम करून घेण्याची लकब एपीआय राहुल फुला यांच्याकडे असावी म्हणून त्यांच्याच पोलिस ठाण्यातील सहकार्यानी आपल्या साहेबांची चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढत अविस्मरणीय निरोप दिला.

बऱ्याचदा बदली झाल्यानंतर औपचारिकता पूर्ण व्हावी म्हणून निरोप देऊन कर्मचारी मोकळे होत असतात. मात्र मारवड पोलीस स्टेशनचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या एपीआय राहुल फुला व आधीच्या एपीआय समाधान पाटील यांच्यामुळे मारवड पोलीस स्टेशनला राज्यात उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून पुरस्कार मिळाला होता.

सर्व कर्मचाऱ्यांशी व सामान्य जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात देखील अमळनेर ग्रामीणला अनेकांना सामंजस्य व आपुलकीने समज देत वातावरण नेहमी हसत-खेळत ठेवले होते. म्हणूनच त्यांची बदली होताच कर्मचाऱ्यांनी त्यांची घोड्यावर मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव केला. मारवड पोलीस स्टेशनला एपीआय राहुल फुला यांच्या जागी आता शहादा येथून नव्याने एपीआय जयेश खलाणे यांनी पदभार घेतला आहे.

 

Exit mobile version