Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल व रावेर तालुक्यातील परिसरात शुक्रवार दि. १० जुन रोजी मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांचे व शेतीला नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची डॉ. कुंदन फेगडे यांनी पाहणी केली.

 

काल दि. १० जून रोजी झालेल्या पावसामुळे रावेर तालुक्यातील सावखेडा येथे ग्रामपंचायत जवळ प्रल्हाद बाबुराव पाटील व समाधान पाटील यांच्या घरावर सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष जुन्या वटवृक्ष कोसळून घराचे नुकसान झाले. तसेच काही दिवसापूर्वी शेती मशागतीसाठी लागणारे ट्रॅक्टर सुद्धा या वृक्षा खाली दाबले गेले. अशा संकटाच्या काळात त्यांना दिलासा दिला व लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती नायब तहसीलदार निलेश चौधरी, ग्रामसेवक, सरपंच यांना केली. त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सामर्थ्य दिले. याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे, श्रीराम फॉउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, उमेश इंगळे , पंकज इंगळे, मनोज धनगर, यशपाल धांडे, संजू कोळंबे, प्रल्हाद पाटील, समाधान पाटील, मधू पाटील, तुषार बढे, यशवंत महाजन, लोकेश महाजन, रोहन सरोदे, कृषी साहाय्य एस. एम जाधव, तलाठी निलेश चौधरी, परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी कृषी अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती

 

Exit mobile version