Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मानवाधिकारी न्याय व सुरक्षा परिषदेच्या उत्तर महाराष्ट्रपदी ॲड. देवकांत पाटील यांची नियुक्ती

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील विरावली येथील अॅड. देवकांत पाटील यांची भारतीय मानवाधिकारी न्याय व सुरक्षा परिषदेच्या उत्तर महाराष्ट्रपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्ष विक्की  राजपूत  यांनी अँड. देवकांत बाजीराव पाटील यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे जळगांव जिल्ह्यात संघटनेचे चांगले काम केल्या बद्दल   दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष विकी राजपुत यांनी अँड .  देवकांत बाजीराव पाटील यांची बढती देत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे . उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  म्हणून  मिळालेल्या जबाबदारीचे बद्दल विश्वास दर्शविला म्हणून आभार व्यक्त करत  मिळालेल्या या  संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकाररांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.

 

पाटील यांच्या निवडीबद्दल  राष्ट्रीय अध्यक्ष विकी राजपूत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले ,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पं. स. गटनेते शेखर सोपान पाटील, जिल्ह्या परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील , माजी उप सभापती दीपक पाटील , उंटावद वि का सा चे चेअरमन शशिकांत पाटील , मराठा सेवा संघ तालुका अजय पाटील , शरद राजपूत , गणेश राजपूत ,प्रकाश पाटील , त्याच बरोबर यावल वकील बार संघ अध्यक्ष धीरज चौधरी ,  सचिव निलेश मोरे  व सर्व वकील सहकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

Exit mobile version